दोन वहिन्यांकडून लहान दीरासोबत नात्याला काळीमा फासणारं कृत्य
दोन वहिन्यांनी मिळून आपल्या लहान दीरासोबत विचित्र प्रकरण केलं. ज्यामुळे संपूर्ण परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे.
मुंबई : उत्तर भारतातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये दोन वहिन्यांनी मिळून आपल्या लहान दीरासोबत विचित्र प्रकरण केलं. ज्यामुळे संपूर्ण परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. खरंतर मोठी वहिनी ही कोणत्याही दीरासाठी आई प्रमाणे असते. परंतु त्यांनीच जर विश्वास घात केला. तर यामुळे नात्याला कलंक लागायला वेळ लागत नाही. नवागचिया पोलीस स्टेशन हद्दीतील मिल्की येथे घरातील किरकोळ वादातून लहान दीराची दोन मोठ्या वहिनींनी हत्या केली. खरंतर यांनी त्याच्या प्रायवेट पार्टला दुखापत पोहोचवली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या तरुणाचं नाव आहे ध्रुव,
पोलिस ठाण्यात दिलेल्या एफआयआरनुसार, ध्रुवचा भाऊ राकेश कुमार याचा मुलाचे १० जून रोजी मुंडण आहे. त्यासाठी संपूर्ण घर तयारीला लागले होते. परंतु असं सगळं करत असताना ध्रुवकुमारच्या हातातून एक जड लाकूड घरातील पपईच्या रोपावर पडलं, ज्यामुळे ते झाडं नष्ट झालं.
पपईचे रोप तुटलेले पाहून राकेश कुमार-रोशनी कुमारी आणि त्रिलोक जैस्वाल-हीरा देवी यांनी ध्रुव कुमारला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
याला ध्रुवकुमारने विरोध केला असता चौघांनीही त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान या दोन वहिन्यांनी ध्रुवचा प्रायव्हेट पार्ट रागाने जोरात पकडला आणि त्याला फिरवसा, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मोठा भाऊ प्रल्हाद याने ध्रुवला उपचारासाठी उपविभागीय रुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी ध्रुवला मृत घोषित केले.
मृताची पत्नी जुली कुमारी हिच्या जबाबावरून नवागचिया पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अर्जात राकेश कुमार-रोशनी देवी आणि त्रिलोक-हीरा यांची आरोपी म्हणून नावे आहेत.
पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या संदर्भात नवगचिया पोलिस स्टेशनचे प्रभारी भारत भूषण यांनी सांगितले की, चार नामांकित आरोपींपैकी दोन राकेश कुमार-रोशनी देवी यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे.