वायुसेनेकडून 2 `ब्रह्मोस` क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
अंदमान-निकोबारमध्ये यशस्वी चाचणी
कोलकाता : 'ब्रह्मोस' हे भारताने रशियासोबत मिळून तयार केलेलं क्षेपणास्त्र आहे. आज हे क्षेपणास्त्र तिन्ही सेनांमध्ये विश्वसनीय क्षेपणास्त्र म्हणून सज्ज आहे. ब्रह्मोस हे भारतीय वायुसेना, नौसेना आणि लष्कर सेना यांच्यात वापरलं जाणार क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र युद्धभूमीवर निर्णायक भूमिका बजावण्याची क्षमता ठेवतं.
भारतीय वायुसेनेने ऑपरेशनल ट्रेनिंगमध्ये दरम्यान 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी 2 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केले. मिळालेल्या रिपोर्टनुसार, 300 किमी दूरवर असलेल्या लक्ष्यवर क्षेपणास्त्राने यशस्वीपूर्व निशाणा साधला. आतापर्यंत वायुसेनेकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राने लढाऊ विमानाद्वारे जमीन अथवा पाण्यावर यशस्वी चाचणी केल्याचं समोर आलं होतं. मात्र यावेळी वायुसेनेने जमिनीवरून येणाऱ्या क्षेपणास्त्राचे परिक्षण केले.
या अगोदर 30 सप्टेंबर रोजी ओडिसामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र लाँच करण्यात आलं आणि सोमवारी त्याची यशस्वी चाचणी देखील झाले. डीआरडीओ (डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन) च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या लँड अटॅकची यशस्वी चाचणी झाली आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार 21 आणि 22 ऑक्टोबरला अंदमान निकोबारच्या द्वीप समुहाच्या ट्राक द्वीपवर भारतीय वायुसेनेद्वारे दोन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.