नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्यानं जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान शहीद झालेत.



सीआरपीएफच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनगरमध्ये शनिवारी सीआरपीएलच्या एका गाडीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. यामध्ये तीन जवान गंभीररित्या जखमी झालेत... तर जखमींमध्ये एका नागरिकाचाही समावेश आहे. हा हल्ला श्रीनगरच्या फतह कदाल भागात झालाय.


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी ८२ बटालियनला ग्रेनेडच्या निशाण्यावर घेतलं. यामध्ये तीन जवान जखमी झाले. जखमींना जवळच्याच हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.