Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कुड्डालोर जिल्ह्यात दोन बसची (Bus Accident) समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर 70 जण जखमी झाले. कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील पट्टमबक्कम येथे हा भीषण अपघात झाला. कुड्डालोर ते पाणरुती दरम्यान दोन खाजगी बसमध्ये हा अपघात झाला. एका बसचा पुढचा टायर फुटल्याने तिचे नियंत्रण सुटले आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या बसची समोरासमोर धडक झाली. जखमींना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातानंतर आजूबाजूच्या सर्वसामान्य नागरिकांनी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोलाची मदत केली. स्थानिकांनीच पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयात नेण्यास मदत केली. बसचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने बस समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली, असे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.



या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात पोहचवण्याचे काम केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी एका बसचा पुढचा टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले हा अपघात घडला, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.


तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.