रांची: झारखंडच्या लोहारगड येथे दोन अल्पवयीन मुलींवर ११ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी १८ ते २८ वयोगटातील आहेत. १६ ऑगस्ट रोजी या तरुणांनी हिरी हारा परिसरात या मुलींवर बलात्कार केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन मुली रात्री बाईक घेऊन फेरफटका मारायला निघाल्या. त्यांची बाईकमध्येच बंद पडली. त्यामुळे मुलींनी त्यांच्या मित्राला फोन करून मदत मागितली. त्या मित्राने त्याच्या मित्रांना घटनास्थळी पाठवले. त्यावेळी अकरा जण तिथे पोहोचले त्यांनी या दोन मुलींना निर्जन स्थळी नेले आणि बलात्कार केला. आरोपींनी मुलींजवळ असलेला फोनही हिसकावून घेतला.


17 ऑगस्टला मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.  त्यानंतर पोलिसांनी तातडीने एक टीम या आरोपींच्या मागावर लावली आणि सर्वांना जेरबंद केले. या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या घटनेची दखल घेऊन कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.