एकाच महिला पोलिसाच्या प्रेमात पडले 2 पोलीस कर्मचारी, पोलीस स्टेशनमध्ये तुफान राडा
One Side Love Story of police constable: दो एका महिला पोलीस शिपाईवर प्रेम जडले. जेव्हा त्या दोघांना त्यांची प्रेमिका एकच आहे असं कळले तेव्हा ते दोघे एकमेकांच्या जीवावर उठले.
Policemen Love Story : बरेलीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एका महिला पोलीस शिपाईवर दोघांचे प्रेम जडले. पण दोघांची एकच प्रेमिका आहे असे कळल्यानंतर दोघे एकमेकांच्या जीवावर उठले. एकाच महिला पोलीस शिपाईवर दोघे प्रेम करत होते. पण हे प्रकरण इतक्यावर थांबले नाही तर ते दोघेही एकमेकांना जीवे मारायला ही आतूर झालेले दिसले.
बहेरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे योगेश आणि मोनू हे दोघेही एकाच पोलीस महिला शिपाईवर प्रेम करत होते. सोमवारी रात्री दोघांमध्येही मोठा वाद झाला. हा वाद इतका वाढला की एकाने पोलीस स्टेशनमध्ये सर्व्हिस रिवॉल्वरने हवेत फायरिंग केली.
ज्या क्षणाला ही घटना घडली त्या वेळेस अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ज्यांनी योगेश आणि मोनूला समजावून शांत केले सोबतच पोलीस स्टेशनमध्ये सर्विस रिवाल्वरने हवेत फायरिंग झोलेला मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला. पण एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांना या प्रकरणाविषयी कळले तेव्हा त्यांनी एसपी क्राईम मुकेश प्रताप सिंह यांना घटनास्थळी पाठवून चौकशी करायला सांगितली. पोलीस स्टेशनला पोहचताच एसपी क्राइम मुकेश प्रताप सिंह याच्यांसमोर सगळं प्रकरण उघडे झाले.
पोलीस शिपाई महिलासोबत प्रेम झाल्यानंतर योगेश आणि मोनू या दोन्ही पोलीस शिपाईंना तिच्यासोबत लग्न करायचे होते. परंतु प्रेमिका एकच असल्यामुळे हे शक्य नाही आणि अशातच दोघे एकमेकांच्या जीवावर उठले. पण सूत्रांनुसार पोलीस शिपाई महिला या दोघानांही सहकर्मचाऱ्यांच्या रुपातच पाहायची. दोन्ही शिपाई त्या पोलीस शिपाई महिलेवर एकतर्फी प्रेम करत होते इतकच नव्हे तर त्या दोघांनी लग्नासदंर्भातली स्वप्ने देखील रगंवली होती.
एसएसपीने या प्रकरणात इंस्पेक्टर सत्येंद्र भडाना आणि इस्पेक्टर क्राईम अनिल कुमार यांच्यासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या सर्वांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.