एलओसीवर पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, दोन जवान जखमी
जम्मू-काश्मीरच्या सीमा रेषेवरील पूँछजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकच्या गोळीबारात भारताचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या सीमा रेषेवरील पूँछजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकच्या गोळीबारात भारताचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी मध्यरात्री १.३० वाजता पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानचे ६ दिवसांत १३ दहशतवादी ठार झाले आहेत, असे सांगितले जात आहे की पाकिस्तानने फायरिंगनंतरही तोफगोळे टाकले. पाकिस्तान वेळोवेळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. गेल्या महिन्यातसुद्धा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
जूनच्या सुरुवातीला भारतीय सैन्यांकडून प्रत्युत्तर दिलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे पाच जवान ठार झाले होते.