अनंतनागमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा, शोध मोहीम सुरू
बगेंदरमध्ये दोन दहशतवाद्यांना मारण्यास सुरक्षा रक्षकांना यश आले आहे.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. गुरूवारी सकाळी अनंतनानच्या बगेंदरमध्ये दोन दहशतवाद्यांना मारण्यास सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी हे हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ही चकमक झाली तिथे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा आणि दारु गोळा सापडला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
बगेंदरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा रक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. या दरम्यान सुरक्षा रक्षकांवर गोळीबारास सुरूवात झाली. सुरक्षारक्षकांनी याला जशास तसे उत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. अजूनही या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.