दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक: आयसिसच्या संपर्कात असल्याची शक्यता
हे दोघेही काश्मीरला जाण्याच्या तयारीत होते.
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री लाल किल्ल्याच्या परिसरातून दोन दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. परवेझ आणि जमशेद अशी या दोघांची नावे आहेत. लाल किल्ल्याजवळील जामा मशीदीकडील बसस्टॉपवर असताना पोलिसांनी त्यांना पकडले. हे दोघेही इस्लामिक स्टेट इन जम्मू काश्मीर (ISJK)या दहशतवादी संघटनेचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही संघटना आयसिसशी संलग्न असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हे दोघेही काश्मीरला जाण्याच्या तयारीत होते. त्याठिकाणी या दोघांना शस्त्रे मिळणार असल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून पुढे आली आहे. या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यापैकी परवेझ याच्या भावाचा मृत्यू जानेवारीत सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. परवेझ आधीपासून दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा सदस्य होता. यानंतर तो इस्लामिक स्टेट इन जम्मू काश्मीर संघटनेत दाखल झाला.