UGC New Guidelines , मुंबई : शिक्षण क्षेत्रातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. यापुढे बारावीनंतर डिग्रीसाठी(Graduation Degree) आता 3 ऐवजी 4 वर्ष लागणार आहेत. यूजीसीनं हा मोठा निर्णय(UGC decision) घेतला आहे. देशातील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी पुढील वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील शैक्षणिक वर्ष अर्थात 2023-24पासून ग्रॅज्युएशनसाठी नवा नियम लागू केला जाणार आहे. 12 वीनंतर डिग्री शिक्षणसाठी आता 4 वर्ष लागणार आहेत. युजीसीनं हा मोठा निर्णय जाहीर केला आहे.  देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 12 वी नंतरच्या डिग्रीसाठी म्हणजेच ग्रॅज्युएशनसाठी विद्यार्थांना आणखी चार वर्षे लागणार आहेत. याबाबतचा महत्वाचा निर्णय विश्वविद्यालय अनुदान आयोग अर्थात युजीसीने जाहीर केला आहे. 


पुढील आठवड्यापासून याबाबतची माहिती सर्व विद्यापीठांना पाठविली जाणार आहे. यामध्ये 45 केंद्रीय विद्यापीठांचा देखील समावेश आहे. तर, अनेक डीम्ड टू बी विद्यापीठेदेखील हा अभ्यासक्रम स्वीकारण्यास तयार झाली असल्याचे समजते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे समजते.