आधार: १ जुलैपासून चेहऱ्याची ओळख लागू करण्यासाठी UIDAI तयार
१२ अंक असलेले विशेष ओळखपत्र लागू करणारी एजन्सी UIDAIने जानेवारी महिन्यातच ही घोषणा केली होती की, लवकरच आम्ही फेस ऑथेंटिकेशन फिचरही सहभागी करणार आहोत.
नवी दिल्ली : भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधारबाबत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. येत्या १ जुलै पासून UIDAI आधार कार्डवर डोळ्यांच्या प्रतिमा, हातांच्या पंजाचे ठशांसोबतच आता चेहऱ्याची ओळखही लागू करणार आहे. येत्या १ जुलैपासून हा नवा बदल सुरू करण्यासाठी UIDAI सज्ज झाली आहे. १२ अंक असलेले विशेष ओळखपत्र लागू करणारी एजन्सी UIDAIने जानेवारी महिन्यातच ही घोषणा केली होती की, लवकरच आम्ही फेस ऑथेंटिकेशन फिचरही सहभागी करणार आहोत. या नव्या बदलामुळे त्या लोकांना फायदा होणार आहे. ज्यांचे फिंगरप्रिंट आणि डोळे स्कॅन करण्यासाठी अडथळा येत होता.
आधारचा डेचा लिक करणे अशक्य - UIDAI
UIDAIने म्हटले आहे की, 'चेहऱ्याची ओळख दाखवणारे फिचर फिंगरप्रिंट, आयरिश किंवा ओटीपी यांपैकी एकाशी जोडलेले असेल. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयापुढे देण्यात आलेल्या एका प्रेजेंटेशनमध्ये UIDAIचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी म्हटले होते की, आधार कार्डचा डेटा लिक करण्यासाठी जगातील सर्वात वेगवान आणि स्मार्ट संगणकाला अनंत वर्षे लागतील. आधारच्या सुरक्षेसंबंधी माहिती देताना पांडे यांनी म्हटले होते की, फेस ऑथेंटिकेशन येत्या १ जुलैपासून सुरू केले जाईल'.
आतापर्यंत कोट्यवधी लोकांचे झाले आथार ऑथेंटिकेशन
'१ बिलियन' नावाचे प्रेजेंटेशन सर्वोच्च न्यायालयासमोर करताना UIDAIच्या सीईओंनी म्हटले होते की, आतापर्यंत १,६९६.३८ कोटी आधार ऑथेंटिकेशन आणि ४६४.८५ कोटी ई-केवायसी ट्रांजेक्शनन्स आतापर्यंत झाले आहेत.'