कोट्यवधी वापरकर्त्यांना UIDAI ची भेट! आधारशी संबंधित काम होणार सोपं, जाणून घ्या सरकारची योजना
बँक, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारद्वारे 52 हजार आधार नोंदणी केंद्रे चालवली जात आहेत.
मुंबई : आधार कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) देशभरात 166 स्वतंत्र आधार नोंदणी आणि अपडेट केंद्रे उघडण्याच्या तयारीत आहे. UIDAI ने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. सध्या 166 पैकी 55 आधार सेवा केंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय बँक, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारद्वारे 52 हजार आधार नोंदणी केंद्रे चालवली जात आहेत.
UIDAIकडून निवेदन जारी
UIDAI ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, 122 शहरांमध्ये 166 सिंगल आधार नोंदणी आणि अपडेट केंद्रे उघडण्याची UIDAI योजना आखत आहे. आधार सेवा केंद्रे आठवड्याचे सातही दिवस काम करतात.
मॉडेल-B च्या आधार सेवा केंद्रांमध्ये (मॉडेल-ए ASKs) दररोज 1 हजार नावनोंदणी आणि अपडेट विनंत्या हाताळण्याची क्षमता आहे. त्याच वेळी, मॉडेल-B ASKs 500 आणि मॉडेल-C ASKs 250 मध्ये नावनोंदणी आणि अद्यतन विनंत्या पूर्ण करण्याची क्षमता आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, UIDAI ने आतापर्यंत 130.9 कोटी लोकांना आधार क्रमांक दिला आहे.
आधार सेवा फक्त बँका, पोस्ट ऑफिस, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि UIDAI द्वारे संचालित सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला याबाबत अधिक माहिती हवी असल्यास, तुम्ही राज्य सरकारच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून (ज्या अंतर्गत आधार केंद्रे सुरू आहेत) तेथून माहिती मिळवू शकता.
इंटरनेट कॅफे आधारशी संबंधित समान सेवा देतात, जी UIDAI सामान्य माणसाला देते. आधार कार्डमध्ये फक्त नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा इतर तपशील दुरुस्त करणे, फोटो बदलणे, पीव्हीसी कार्ड प्रिंट करून घेणे, सामान्य आधार कार्ड मागणे इत्यादी सुविधा तेथे उपलब्ध आहेत.
UIDAI द्वारे आधारमध्ये कोणत्याही दुरुस्तीसाठी किंवा PVC कार्ड मिळविण्यासाठी निर्धारित शुल्क 50 रुपये आहे, परंतु, कॅफेमध्ये 70 ते 100 रुपये आकारते, जाते तसेच ज्या लोकांना घाईत किंवा लवकर आधारशी संबंधीकत काम करायचं आहे, त्यासाठी हा चांगला मार्ग आहे. कारण तुम्हाला येथे रांगेत थांबावे लागत नाही.