UIDAIने आधार कार्डमध्ये केला सर्वात मोठा बदल
आता तुम्हाला आधारकार्ड असं दिसणार
मुंबई : यूआयडीएआयने ई आधारसाठी QY कोडमध्ये बदल केला आहे. या क्यूआर कोडमध्ये आता आधार धारकासोबत त्याचा फोटो देखील जोडला गेला आहे. आधार जाहीर करणाऱ्या या संस्थेने सांगितले आहे की, या ई आधार कार्डावर असलेल्या क्यूआर कोडच्या जागी नवा क्यूआर कोड देखील सुरू केला आहे. या क्यूआर कोडमध्ये आधार कोणत्याही इनडिविज्युअल डेमोग्रॅफिक डिटेलसोबत फोटो देखील असणार आहे.
नव्या QR कोडमुळे वेरिफिकेशन झालं सोपं
आतापर्यंत क्यूआरकोडमध्ये फक्त आधार धारकाची माहिती उपलब्ध असते. मात्र नव्या कोडमध्ये फोटो देखील उपस्थित असणार आहे. क्यूआरकोडमध्ये बारकोड लेबलच्या रुपात आहे. यामधील माहिती मशिन वाचू शकते. ई आधार 12 अंकाच्या विशेष संख्या इलेक्ट्रॉनिक संस्करण सारख्या यूआयडीएआयच्या वेबसाइटमध्ये डाऊनलोड केलं जातं.
बदलणार आता आधार
प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, आधार कार्डचे वेरिफिकेशन ऑफलाइन देखील करू शकतात. यूआयडीआयने सीईओ अजय भूषण यांनी सांगितलं की, हे आधार कार्ड ऑफलाईन प्रणालीत उपलब्ध असणार आहे. यावर आता फोटो असणार आहे.