मुंबई : आधार कार्डवरील माहिती लिक होण्याच्या मुद्यावरून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यामध्ये काही बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यूआयडीएआयने वर्चुअल आयडीची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर देण्याची गरज लागणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्डचा होणारा गैरवापर पाहता आधार वर्चुअल आयडी वापरण्यात आता सरकारने जोर दिला आहे. काय आहे आधार वर्चुअल आयडी? त्याचा फायदा सामान्य नागरिकांना कसा होणार ? 


काय आहे वर्चुअल आयडी ? 


आधार वर्चुअल आयडी एका प्रकारे तात्पुरता नंबर दिला जाणार आहे. हा 16 अंकी आकडा असणार आहे. हा नंबर आधार कार्डचा क्लोन असणार आहे. यामध्ये असलेल्या माहितीद्वारे UIDAI युझर्स ला वर्चुअल आयडीची संधी मिळणार आहे. आता कुणाला माहिती द्यायची असेल तर 12 अंकाच्या आधार कार्डपेक्षा 16 अंकाचा वर्चुअल आयडी मिळणार आहे. हे आयडी 1 जूनपासून लागू होणार आहे. 


कुठे जनरेट करू शकता वर्चुअल आयडी ? 


आधार वर्चुअल आयडीला UIDAI च्या पोर्टलवरून जनरेट करू शकतो. ही एक डिजिटल आयडी आहे. आधार होल्डर याला खूप वेळा जनरेट करू शकता. VID हा फक्त एका दिवसासाठी वॅलिड असणार आहे. त्यामुळे एका दिवसानंतर ते आयडी नंबर नष्ट होणार आहे. त्यामुळे आता आधार कार्डद्वारे तुम्ही वर्चुअल आयडी रोज जनरेट करू शकता. UIDAI च्या संकेतस्थळावर हा वर्चुअल आयडी जनरेट करू शकता. 


अशा जनरेट करा वर्चुअल आयडी?


VID जेनरेट करण्यासाठी UIDAI च्या होमपेज वर जा. 


त्यानंतर आधार नंबर टाका, सिक्यपरिटी कोड टाका आणि SEND OTP वर क्लिक करा. 


ज्यामध्ये मोबाईल नंबरवरून आधार कार्ड रजिस्टर्ड होईल. तिथे तुम्हाला OTP नंबर दिला जाणार आहे. 


OTP टाकल्यानंतर आता नवीन VID जनरेट करण्याचा ऑप्शन दिला जाईल. 


त्यानंतर तुम्हाला 16 नंबरी आकडा मिळेल जो वर्चुअल आयडी असणार आहे. 



वर्चुअल आईडीमुळे नेमकं काय होणार?


वर्चुअल आयडीमुळे नाव, पत्ता आणि फोटो यातून वेरिफिकेशन केलं जाणार आहे. 


जुना आयडी क्रमांक नष्ट होईल.