नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये व्हेरिफिकेशनसाठी येत्या जुलैपासून एक नवे फिचर सुरू होत आहे. UIDAI दिलेल्या माहितीनुसार येत्या १ जुलैपासून हे फिचर लॉन्च करण्यात येत आहे. हे नवे फिचर ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. युनीक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने हा दावा केला आहे की, फेस ऑथेंटिकेशन फिचरमुळे ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के फायदा होणार आहे. हा दावा अधिक भक्कमपणे व्यक्त करताना UIDAIने सर्वोच्च न्यायालयात काही मुद्दे अधिक स्पष्टपणे मांडले. UIDAI म्हटले आहे की, या नव्या फिचरवर जवळपास ८३ टक्के ज्येष्ठ नागरिक हे संतृष्ट आहेत.


ज्येष्ठांना ओळख पटवताना येत होत्या अडचणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्यास्थितीत आधार कार्डवर फिंगर प्रिंट घेऊन ओळख पटवली जात असे. पण, अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या हाताचे ठसेच वयोपरत्वे गायब झाल्यामुळे त्यांना ओळख पटविण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे या नागरिकांना सरकारी सेवांचा लाभ घेण्यापासून दूर रहावे लागते. UIDAIने केलेल्या दाव्यानुसार या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांसोबतच इतर सर्वांनाच फायदा होणार आहे. 


४५०० ज्येष्ठांवर केली चाचणी


UIDAIने फेस ऑथेंटिकेशन फिचर सुरू करण्यापुर्वी त्याची ९ राज्यांमध्ये सुमारे ४५०० ज्येष्ठ नागरिकांवर चाचणी घेतली. या चाचणीत फेस आणि फिंगर प्रिंट टेस्ट ९९ टक्के यशस्वी ठरले. तसेच, फिंगरप्रिंट आणि डोळ्यांच्या पटलांचे व्हेरिफिकेशनची चाचणीही ९५ टक्के यशस्वी राहिली. दरम्यान, पेन्शन, सरकारी योजना आदींचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार अनिवार्य केले आहे.