Good News : सध्याच्या काळात आधारकार्ड (Aadhaar Card) हे तुमच्या ओळखीचं सर्वात महत्वाचं दस्तावेज बनलं आगहे.  आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयांचा आधार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. रेल्वेच्या अरक्षणापासून ते सिम कार्डच्या खरेदीपर्यंत आज सर्वत्र आधार कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आधारकार्डशी संबंधीत काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी त्या तुलनेत पुरेशी आधार सेवा केंद्र नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन UIDAI ने 


आता ही बाब लक्षात घेऊन युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एक मोठी योजना आखली आहे. याअंतर्गत देशातील मोठ्या शहरांमध्ये शेकडो केंद्र सुरु केली जाणार आहेत. 


पुरेशी आधार सेवा केंद्र सुरु होणार
UIDAI ने देशातील 53 मोठ्या शहरांमध्ये 114 आधार सेवा केंद्र सुरु करण्याची योजना तयारी केली आहे. देशातील सर्व मेट्रो शहरं, राज्यांच्या राजधानी आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आधार कार्ड सेवा केंद्र सुरु केली जाणार आहेत. सध्या देशात कार्यरत असलेल्या आधार सेवा केंद्रांची एकूण संख्या 88 आहे, जी वाढवण्याची तयारी केली जात आहे.


सेवा केंद्रांव्यतिरिक्त देशभरात 35,000 हून अधिक आधार केंद्र आहेत. बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारे  ही सेवा केंद्र चालवत आहेत.


रविवारीही काम करतात सेवा केंद्र
नवीन आधार कार्ड (New Aadhar Card) बनवायचं असेल किंवा आहे त्या आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर आधार सेवा केंद्रात तुम्ही सातही दिवस सेवा घेऊ शकता. या आधार सेवा केंद्रांमध्ये वृद्ध आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जातात.


तुम्ही बायोमेट्रिकशी संबंधित काम किंवा आधारमध्ये नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी सहज अपडेट करू शकता.


आधार अपडेट करण्याचं शुल्क
आधार नोंदणी - मोफत
बायोमेट्रिक अपडेट – 100 रुपये
नाव, पत्ता, जन्मतारीख – 50 रुपये
मुलांचे बायोमेट्रिक - मोफत


अधिक शुल्क आकारल्यास तक्रार करा
तुम्ही एखाद्या आधार केंद्रावर अपडेटसाठी (Aadhar Update) गेलात आणि तेथे निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रकमेची मागणी होत असेल, तर अशा परिस्थितीत तुमच्याकडे संबंधितांकडे तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्ही uidai.gov.in वर मेलद्वारे किंवा टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.