मुंबई : हैदराबाद येथे नुकतीच तीन दिवसीय जागतिक उद्योजक परिषद पार पडली. या परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अ‍ॅडव्हायझर इव्हान्का ट्रम्पदेखील सहभागी झाली होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्‍यांचं लक्ष वेधून घेणारी इव्हांका मायदेशी परतली आहे. पण ट्विटरवर तिची फार चर्चा झाली. अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे तिचे फोटो आणि काही व्हिडिओजचे मेम्ज केले आहेत. 


आधारकार्डाचा मेम्स होतोय व्हायरल


आधारकार्ड हा सध्या भारतातील सर्वाधिक चर्चिला जाणारा एक विषय आहे. इव्हांकाच्या भारत भेटीतील एका व्हिडिओला आधारकार्डाशी जोडून खास व्हिडिओ बनवण्यात आला आहे. 
या व्हिडिओला बॅकग्राऊंड व्हॉईस देत @hoezaay अया ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं आहे. 




इव्हांका भारतामध्ये आधारकार्ड काढण्यासाठी आली आहे. असा अशयाचा व्हॉईस ओव्हर करण्यात आला आहे.


 


UIDAI चा रिप्लाय 


UIDAI नेही या ट्विटची दखल घेत त्यावर सडेतोड रिप्लाय दिला आहे. 



इव्हांकाने जागातिक उद्योजक परिषदेला भेट दिली. स्त्री उद्योजिकांची भेट घेतली. त्यानंतर इव्हांकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खास भोजनाचा आस्वाददेखील घेतला. 


हैदराबाद येथील काही ऐतिहासिक स्थळांनाही इव्हांकाने भेट दिली.