Nitin Gadkari : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणात त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे बरेच चर्चेत असतात. हाती आलेलं काम पूर्ण करण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी ते ओळखले जातात. अशा या गडकरींनी पुन्हा एकदा मनं जिंकणारं काम केलं आहे. यावेळी त्यांनी एका खासदाराला दिलेला शब्द पाळत जणू त्यांना आयुष्यभराची भेट दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकरींनी उज्जैनचे (Ujjain) भाजप (BJP) खासदार (MP), अनिल फिरोजिया (Anil Firozia) यांना वजन कमी करण्याचं Challange दिलं होतं. त्यांनीह हे आव्हान स्वीकारत, वजन कमी करत आपल्या लोकसभा मतदार संघासाठी स एकदोन नव्हे तब्बल 1000  कोटी रुपयांचा विकासनिधी मिळवला. 


झाल्या संपूर्ण प्रकाराविषयी फिरोजिया सांगतात, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया (Fit India ) मुवमेंट सुरु केली. तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला मंचावरच आव्हान दिलं, जितके किलो वजन कमी कराल, तितके हजार कोटी रुपये तुमच्या मतदार संघाच्या विकासासाठी मिळतील. बस्स.... मी हे आव्हान स्वीकारलं आणि 15 किलो वजन कमी केलं होतं.' फिरोजिया यांनी इतरांनाही सुदृढ शरीरासाठी वजन कमी करण्याचा सल्ला दिला. 


अधिक वाचा : दरवर्षी मिळणार 2 LPG सिलिंडर मोफत, सरकारने केली मोठी घोषणा; PNG -PNGही स्वस्त


गडकरींनी दिलेल्या आव्हानापोटी आणि आपल्या मतदार संघाच्या विकासापोटी फिरोजिया यांनी आतापर्यंत तब्बल 32 किलो वजन कमी केलं. आहाराच्या सवयी, योगसाधना, व्यायाम या सर्व गोष्टींचं त्यांनी काटेकोरपणे पालन केलं. पुढे ज्यावेळी त्यांची आणि गडकरींची भेट झाली, तेव्हा त्यांनी आपल्यामध्ये झालेल्या या बदलाची माहिती केंद्रीय मंत्र्यांना दिली आणि त्यांनीही दिलेला शब्द पाळत 2300 कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर केला. 32 हजार कोटी रुपयांपैकी 2300 कोटी रुपये इतकी रक्कम मिळवणं हीसुद्धा लहान गोष्ट नाही. 



याच अनोख्या शर्तीविषयी सांगताना गडकरी म्हणाले, 'मी फिरोजियाजींसमोर एक अट ठेवली होती. एक वेळ अशी होती की माझं वजन फिरोजिया यांच्याहूनही जास्त होतं. माझं वजन 135 किलो होतं. आज ते 93 किलो आहे. मी त्यांना माझाच एक जुना फोटो दाखवला होता जिथं मी ओळखूही येत नव्हतो. मी फिरोजिया यांच्यापुढे एक आव्हान ठेवलेलं, ते जितकं वजन कमी करतील तितके हजार कोटी रुपये निधी स्वरुपात देईन.'


बस्स, मग काय? फिरोजिया यांनी हे आव्हान स्वीकारत चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली. 23 फेब्रुवारी 2022 पासून त्यांचा हा प्रवास सुरु झाला. त्यावेळी त्यांचं वजन 130 किलो होतं. जून महिन्यापर्यंत त्यांनी 15 किलो वजन कमी केलं. आज, ऑक्टोबर महिन्यात ते 98 किलोपर्यंत पोहोचले आहेत. थोडक्यात त्यांनी एकूण 32 किलो वजन कमी केलं आहे. आहे की नाही हा प्रेरणादायी प्रवास?