नवी दिल्ली : अॅस्ट्राजेन्का आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं संशोधित केलेल्या सिरमच्या लसीला  ब्रिटटनं आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर आता भारतातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आज एसईसीची बैठक होणार असून या बैठकीत सिरमच्या लसीला मंजुरी देण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकार ब्रिटनच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होतं. आता ब्रिटननं या लसीला आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता भारतातही या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सिरम इंस्टिट्यूटनं आतापर्यंत ४ ते ५ कोटी लसींची निर्मिती केलेली आहे. तसंच जूनपर्यंत ३० कोटी लसी बनवण्याचं सिरमचं लक्ष्य आहे.


ब्रिटनने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राजेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे. कोरोना लसीला मान्यता देणारा ब्रिटन पहिला देश ठरलाय. लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे.


ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनानऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ ऍस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला सरकारनं मान्यता दिली आहे.