मुंबई : कोरानामुळे भारतातच नाही, तर संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. ज्यामुळे सगळंच ठप्पं झालं होतं. परंतु याकाळातील एका रिसर्च दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिपोर्टनुसार महामारीच्या काळात देशात अतिश्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. भविष्यातही या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे श्रीमंतांच्या संख्येत ही वाढ शेअर बाजारातील तेजी आणि डिजिटल क्रांतीमुळे झाली आहे. नाइट फ्रँकने वार्षिक अहवालात म्हटले आहे की, महानगरात श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2026 पर्यंत ही संख्या आणखी वाढेल आणि यामध्ये कोलकाता आघाडीवर असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2026 पर्यंत तेथील अतिश्रीमंतांची संख्या 43.2 टक्क्यांनी वाढून 368 होईल. कोलकातामध्ये सध्या 256 (2021 पर्यंत) अल्ट्रा हाय नेट वर्थ व्यक्ती (UHNWIs) आहेत, ज्यांची संख्या 2016 मध्ये 119  होती.


अहवालात $30 दशलक्ष म्हणजेच सुमारे 226 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्यांना अत्यंत श्रीमंत म्हणून वर्णन करण्यात आले आहे.


अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, मुंबईत निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. हैदराबादमध्ये त्यांची संख्या 467 आहे. बंगळुरूमध्ये त्यांची संख्या 352 झाली आहे. दिल्लीत हा आकडा 210 आणि मुंबईत तो 1 हजार 596 वर पोहोचला आहे.


अमेरिका-चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे


गेल्या वर्षी देशातील श्रीमंतांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अत्यंत श्रीमंतांच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. देशात सध्या 145 अत्यंत श्रीमंत लोक आहेत. अमेरिका 748 अत्यंत श्रीमंतांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर चीन 554 श्रिमंत लोकांच्या नंबरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.


जगातील श्रीमंतांमध्ये 9.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे


संपत्ती सल्लागार नाईट फ्रँक यांनी 'द वेल्थ रिपोर्ट 2022' च्या त्यांच्या ताज्या आवृत्तीत सांगितले की, जागतिक स्तरावर अतिश्रीमंतांची संख्या 9.3 टक्क्यांनी वाढून 2021 मध्ये 6 लाख 10 हजार 569 झाली आहे, जी मागील वर्षी 5 लाख 58 हजार 828 होती.