Umesh Pal Murder Case CCTV: उत्तर प्रदेशातील (UP) प्रयागराज येथील उमेश पाल हत्या प्रकरण (Umesh Pal Murder Case) अजूनही चर्चेत बनला आहे. या घटनेने उत्तर प्रदेश (UP Crime News) प्रशासनासह शासनही हादरलं आहे. दिवसाढवळ्या गुन्हेगारांचा प्रताप समोर आल्याने लोकांच्या मनात भीतीचं वातावरण असल्याचं पहायला मिळतंय. अशातच भरदिवसा घडलेल्या या प्रकरणाचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन दिवसांपूर्वी समोर आलेला या हत्याकांडाचा 32 सेकंदांचा रस्त्यावरचा व्हिडिओ त्याच्या दुसऱ्या बाजूचा असल्याचं समोर येतंय. त्यात घटनेवेळीचं सर्वकाही कैद झालंय. सीसीटीव्ही फुटेज उमेश पाल याच्या घराच्या गल्लीतील असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये उमेश पाल यांच्या नवीन घराच्या दरवाजापासून ते गल्लीपर्यंत ही घटना दिसते. त्यामध्ये उमेश पालची भाची दिसत आहे. (Umesh pal murder case new cctv video 13 year old niece running away street latest crime news)


रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूला स्वतंत्र कॅमेरे असल्याने संपूर्ण घटनेची माहिती मिळत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये (Umesh Pal CCTV Video) भाची घाबरून घरात घुसल्याचं दिसत आहे. नवीन सीसीटीव्ही फुटेजमधून उमेश पालची 13 वर्षांची भाची पळून जाताना दिसत आहे. तर काही लोकं घाबरून बाहेर आल्याचं देखील दिसतंय. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू असल्याचं पहायला मिळतंय.


पाहा VIDEO -



उमेश पाल हत्येप्रकरणी पोलीस बाहुबली अतिक अहमदची (Atiq Ahmed) मुलं असद आणि गुड्डू यांचा शोध घेत होते.त्यानंतर शनिवारी पोलिसांना मोठं यश मिळालं. अतिकचा मुलगा असद याला कार पुरवणाऱ्या आरोपी ट्रॅव्हल ऑपरेटरला पोलिसांनी पकडलंय. प्रकरणात वापरलेल्या क्रेटा कारचा मालक रुखसार अहमद उर्फ​पिंटू याच्या देखील मुसक्या आवळ्या आहेत. तो नेपाळमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.


आणखी वाचा - Couple Viral Video: घरात लग्नाची तयारी अन् समोरच्या गच्चीत असं काही दिसलं की...


दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Trending Video) गनर राघवेंद्र खाली पडताना दिसत आहे. त्याशिवाय उमेश पालची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य घराबाहेर पडताना दिसत आहेत. गनर खाली पडल्यानंतर काही उपस्थितांनी त्याला उचलून घरात नेलं.