Unclaimed Deposit In Banks : अनेकांना पैसा जमा करण्याची सवय असते. काही जण घरात पैसे जमवून ठेवतात तर काही जण बँकेत पैसे भरतात. अनेकदा जमा केलेली रक्कम लक्षात येत नाही. देशभरातील बँकांमध्ये 7821300000 इतकी रक्कम जमा आहे. या रकमेवर कुणीच दावा केलेला नाही. या रकमेचे तुम्ही तर वारसदार नाही. तुम्ही ऑलनाईल याचा स्टेटस चेक करु शकता. 


हे देखील वाचा... एका दिवसाचा पगार 48 कोटी! भारतीय बनला सर्वात जास्त पगार घेणारा जगातील एकमेव व्यक्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेत जमा असलेली रक्कम ज्यावर कुणीच दावा केला नाही अशा रकमेचा डेटा  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ने शेअर केला आहे. मार्च 2024 पर्यंत देशभरातील विविध बँकांमध्ये एकूण 78,213 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. या रकमेवर अद्याप कुणीच दावा केलेला नाही. दावा न केलेल्या या रकमेचा हा आकडा वर्षानुवर्षे सातत्याने वाढत आहे. अशा प्रकारे दावा न केलेली रक्कम  RBI द्वारे डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEAF) मध्ये हस्तांतरित केली जाते, ज्याद्वारे या रकमेवर वार्षिक फक्त 3 टक्के व्याज मिळते. 


या दावा न केलेल्या रकमेचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच रक्कम जमा करणाऱ्यांच्या वारसदारांना ही रक्कम मिळवता यावी यासाठी RBI ने ऑगस्ट 2023 मध्ये अनक्लेम्ड डिपॉझिट-गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन (UDGAM) पोर्टल लाँच केले. हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना वेगवेगळ्या बँकांमधील दावा न केलेल्या ठेवी एकाच ठिकाणी ट्रॅक करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


UDGAM पोर्टल हे RBI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (ReBIT), इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाईड सर्व्हिसेस (IFTAS) आणि सहभागी बँकांच्या सहकार्याने डेव्हलप केलेले एक-स्टॉप प्लॅटफॉर्म आहे. अनेक बँकांमधील हक्क नसलेल्या ठेवी शोधण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले. आत्तापर्यंत, देशातील जवळपास 30 बँका या पोर्टलचा भाग आहेत.  ज्यामध्ये दावा न केलेल्या सुमारे 90% ठेवी ठेवल्या जातात. 
सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), दक्षिण भारतीय बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्ष्मी बँक, DBS बँक इंडिया आणि सिटी बँक यांना पोर्टलमध्ये लिस्टिंग करण्यात आले. टप्प्याटप्प्याने इतर बँकांना या पोर्टलशी जोडण्यात आल्या आहेत.


असा चेक करा स्टेटस


  • सर्वप्रथम, UDGAM पोर्टल udgam.rbi.org.in वर जा. 

  • दावा न केलेल्या रकमेच्या टॅब वर क्लिक करुन नोंदणी करा. 

  • नोंदणी करण्यासाठी, तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि तुमचे नाव प्रविष्ट करा. 

  • पासवर्ड सेट करुन कॅप्चे कोड टाका. 

  • चेक बॉक्सवर टिक करा आणि पुढील क्लिक करा. 

  • त्यानंतर OTP टाकून पडताळणी करा.

  • नाव आणि मोबाईल नंबर टाकून पासवर्ड तयार करा.  

  • मोबाईल नंबर आणि पासवर्डने तुम्ही यावर लॉगिन करू शकता. 

  • दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेऊन तु्मही दावे देखील करू शकतात.