Bhagalpur Bridge Collapse :  बिहारमधील भागलपूरमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. बिहारमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला आहे. 
सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अवघ्या काही क्षणांत पुलाला जलसमाधी मिळाली आहे. पूल कोसळल्यानं जनतेच्या कोट्यवधी रूपयांचा चुराडा झाला आहे. हा पूल कोसळताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अत्यंत थरारक अशा या व्हिडिओमध्ये पूल दोन तुकड्यांमध्ये तुटताना दिसत आहे (Bihar Bridge Collapse ). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूल गंगा नदीत विसर्जित


भागलपूर-सुलतानगंजमध्ये गंगा नदीवर हा पूल बांधण्यात येत होता. या चौपदरी पूलाचे 30 हून अधिक स्लॅब म्हणजेच सुमारे 100 फुटांचा भाग कोसळल्याची माहिती  समोर आली आहे. खगरिया आणि भागलपूर जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा पूल बांधला जात होता.


पूल कोसळतानाही थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद


प्रत्यक्षदर्शींनी पूल कोसळतानाही थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत. पूल कोसळला तेव्हा अनेक जण येथे उपस्थितीत. अनेकांनी हा सर्व घटनाक्रमक कॅमेऱ्यात कैद केला. अत्यंत थरारक असा हा व्हिडिओ आहे. अवघ्या काही सेकंदात हा पूल नदीत कोसळला आहे.  या व्हिडिओत पूलाचे दोन तुकडे झाल्याचे दिसत आहे. दोन भागात हा पूल तुटून नदीत पडला आहे. 


1750 कोटींचा चुराडा


हा पूल बांधण्यासाठी तब्बल 1750 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या दुर्घटनेमुळे 1750 कोटींचा चुराडा झाला आहे. हा पूल म्हणजे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या पुलाचा भागही कोसळला होता.


 



निकृष्ट दर्जाचे बांधकाम


या पूलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. पूल निर्मीतीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील केली जात आहे. या अपघातात कोणीही दगावल्याची अथवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. हा पूल  निर्माणाधीन होता. या पुलावरुन जर वाहतूक सुरु असती तर मोठा अनर्थ झाला असता.