लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बस्तीमध्ये एक निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळलाय. एनएच-२८ वर या उड्डाण पुलाचं काम सुरु होतं. सकाळच्या सुमारास हा उड्डाणपूल कोसळलाय. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून दोन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची तातडीने दखल घेत स्थानिक प्रशासनाला घटनास्थळी सर्व मदत पुरवण्याचे आदेश दिलेत. 


पश्चिम बंगालमध्येही पूल कोसळला


उत्तर प्रदेशच्या बस्ती इथल्या उड्डाणपूल दुर्घटनेनंतर पश्चिम बंगालमध्येही अशीच एक घटना घडलीय. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीच्या गोलटुली इथं रेल्वे उड्डाणपूलाच्या गर्डरचा काही भाग कोसळलाय. राष्ट्रीय महामार्ग ३१-डी इथं या उड्डाणपुलाचं काम सुरु आहे. या ठिकाणी काम सुरु असताना या पूलाच्या गर्डरचा काही भाग कोसळलाय. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.