गॅंगस्टर रवी पुजारीला भारतात आणलं
हत्या आणि खंडणीचे २०० हून अधिक गुन्हे रवी पुजारीवर दाखल
मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला दक्षिण आफ्रिकेत पुजारीला अटक करण्यात आली होती. आज त्याला भारतात आणण्यात आलं आहे. रविवारी मध्यरात्री आफ्रिकेतील सेनेगलमधून त्याला इथे आणण्यात आले. हत्या आणि खंडणीचे २०० हून अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गेल्या काही वर्षांपासून रवी पुजारी पोलिसांना चकवा देत होता. सुरुवातीच्या चौकशीला त्याने सहकार्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेतल्या सेनेगलमध्ये पुजारीला अटक करण्यात आलीये. विशेष म्हणजे सेनेगल पोलिसांच्या तावडीतूनच गेल्यावेळी पुजारी फरार झाला होता. काही रॉ ऑफिसर्स आणि कर्नाटक पोलिसदेखील दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांच्या मदतीने पुजारीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं.
पुजारी काही वर्षांपूर्वी छोटा राजनचा सहकारी होता. राजनची साथ सोडल्यानंतर त्याने स्वत:ची गॅंग बनवली. बॉलीवुडच्या अनेक स्टार्सना धमकावण्याचे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत. सलमान खान, शाहरुख खान सहीत अरिजित सिंह यांच्या तक्रारी आहेत.
पुजारीला भारतात सोपावण्याचे आवाहन सेनेगल सरकारला २०१९ ला करण्यात आले होते.