नवी दिल्ली : राम मंदिर आणि जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आता मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता आहे. समान नागरी कायद्याचा (Uniform Civil Code) मसुदा बनवण्याचं काम सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
 
गृहमंत्री अमित शाह यांनी पदाधिका-यांच्या बैठकीत हे स्पष्ट केले आहे. अमित शाहांनी भाजप पदाधिका-यांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राम मंदिर, कलम 370 नंतर समान कायदा लागू करण्याची वेळ आली आहे. असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समान नागरी कायद्याबाबत दोन मतं आहेत. भारतात अनेक वर्षांपासून यावर वाद सुरु आहे. पण समान नागरी कायदा लागू झाला तर काय होईल. जाणून घेऊया.


भारतीय राज्यघटनेत कायद्यांचं दोन भागात वर्गीकरण केलं जातं. नागरी कायदे आणि गुन्हेगारी कायदे.


लग्न, संपत्ती, वारसदार यांसारखे कुटुंब किंवा व्यक्तीशी संबंधित प्रकरणं नागरी कायद्याअंतर्गत येतात.


समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. केंद्राने कुठलाही कायदा बनवला तरी त्यात बदल करण्याचे अधिकार राज्यांना असतात. केंद्राने बनवलेल्या कायद्याच्या मॉडेलवर राज्य आपाला कायदा बनवू शकतात.


समान नागरी कायद्याचा म्हणजे सर्व धर्मांसाठी एकच कायदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व समाजांमध्येही एकसारखेच कायदे.