Union Bank News: तुमचं पण युनियन बँकेत खाते आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. युनियन बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. बँकेकडून बचत खात्यावरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. बँकेने केलेल्या बदलांनंतर, बचत खात्यावर (Saving Account) जास्तीत जास्त 4% परतावा दिला जात आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बचत खात्यांवरील बदललेले व्याजदर 20 नोव्हेंबर 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेने व्याजदरात बदल केल्यानंतर 50 लाखापर्यंतच्या बॅलेन्स रकमेवर 2.75 टक्के व्याजदर आणि 50 लाख ते 100 कोटी रुपयांच्या बॅलेन्स रकमेवर 2.90  टक्के व्याजदर देण्यात येत आहे. त्याशिवाय युनियन बँक 100 ते 500 कोटी रुपयांच्या सेव्हिंगवर 3.10 परतावा देत असून 500 कोटी ते 100 कोटी रुपयांपर्यंत बॅलेन्स रक्कम असल्यास बँक 3.40 व्याज दर देत आहे. त्याचबरोबर 1000 कोटींपेक्षा जास्त बचतीवर बँक 4.00% व्याजदर देत आहे.


नेट प्रॉफ‍िटमध्ये  जबदरदस्त फायदा


युनियन बँकेकडून दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण झालेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहित निव्वळ नफा 90 टक्क्यांना वाढून 3,5114 कोटी रुपये झाला आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत युनियन बँकेला 1,848 कोटी रुपयांचा नफा झाला होता. आर्थिक वर्ष 23 च्या याच तिमाहीशी तुलना केली असता ती 8,305 कोटी रुपये होती. FY24 च्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न 10% ने वाढून Rs 9,126.1 कोटी झाले.


अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती.IOB ने FD वरील व्याजदर एक वर्षावरून दोन वर्षांपर्यंत 30 बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. परंतु बँकेने 444 दिवसांच्या एफडीच्या व्याजदरात 15 बेस पॉइंट्सने कपात केली आहे. बँक 7-29 दिवसांत मॅच्युअर  होणाऱ्या FD वर 4 टक्के व्याज देत आहे.


व्याज दरात वाढ का?


महागाई कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, RBI ने मे 2022 पासून सुमारे एका वर्षात रेपो दरात 2.5 टक्के वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकांना गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यांसारखी सर्व प्रकारची कर्जे महाग करावी लागली. बँकांनी व्याजदर वाढवल्याने बाजारातील ल‍िक्‍व‍िड‍िटी  कमी होते आणि मागणी घटते त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत होते.त्यामुळं बँक बचत खाती, एफडी आणि इतर बचत योजनांवरील व्याज वाढवतात.