नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं बजेट आज सादर करणार आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बजेटला खूप महत्व प्राप्त झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार सर्वसामान्यांना आणि नोकरदारांना मोठा दिलासा देणार असे मानले जात आहे. तरूणांकडेही खास लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया सर्वसामान्यांना बजेटमधून काय आहेत अपेक्षा...


जेटलींकडून सर्वसामान्यांना अपेक्षा


- टॅक्समध्ये मिळणारी सूट २.५ लाखाहून वाढवून ३ लाख रूपये व्हावी.


- स्टॅंडर्द डिडक्शनची वापसी व्हावी.


- मेडिकल रिम्बर्समेंट १५ हजारांहून वाढून ५० हजार रूपये व्हावे. 


- ट्रान्सपोर्ट अलाऊन्स १६०० ऎवजी वाढवून ३ हजार व्हावा.


- लहान मुलांना शिक्षण भत्ता १०० हून वाढवून १००० रूपये व्हावा.
 
- ८०सीमध्ये बचत १.५ लाखाहून वाढवून २ लाख रूपये व्हावी.


- लहान शहरांमध्येही HRA मध्ये सूट सीमा वाढवावी.


- LTA मध्ये प्रत्येक वर्षी प्रवासावर सूट मिळावी.


- पेट्रोल-डिझेलच्या एक्साइज ड्यूटी कमी व्हाव्या.


- रेल्वे प्रवास सुरक्षित आणि आरामदायक करावा.


कृषी क्षेत्रावर भर?


गुजरातमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुकामध्ये भाजपने पाहिले की, त्यांचा ग्रामीण भागातील मतदार दूर जात आहे. अशात कृषी क्षेत्राला अधिक प्रोत्साहन दिलं जातं शकतं. तसेच लघु उद्योगांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. जीएसटीमधील काही गोष्टींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.