नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये टॅक्स संदर्भातील अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, अर्थव्यवस्थेत रुपयाला महत्व आहे. कारण रुपया कर रुपाने जमा होता. तर विविध योजनांसाठी तरतूद करण्यात येते. त्यावेळी रुपया जातो. म्हणजेच रुपया कसा येतो आणि कसा जातो याचे गणित आपण समजून घेण्याचा प्रयत्न करु. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त १ रुपया एक्साईज ड्यूटी लावली. त्यानंतर सोने आणि चांदीवर आयात शुल्क वाढवण्यात आले. त्यामुळे सोने, मौल्यवान वस्तू महागणार आहेत. सीमाशुल्कात २ टक्के वाढ करण्यात आल्याने सोने महाग होणार आहे. तर पेट्रोल, डिझेलच्या दरात १ रुपयाने वाढ होणार आहे. पेट्रोल आणि डिझेल या इंधनावरील सीमा शुल्कामध्ये एक रुपया प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे. 


असा येणार आणि असा जाणार बडा रुपया



केंद्र सरकारने आयात शुल्क करामध्येवाढ केली आहे. त्यामुळे काही वस्तू महागल्या आहेत. आयात पुस्तकांवर पाच टक्के शुल्क लागणार आहे. ऑटो पॉर्ट्स, सिथेंटिक रबर, पीव्हीसी, टाइल्स या वस्तू देखील महाग होणार आहेत. सीमा शुल्कवाढ केल्यामुळे पेट्रोल-डिझेल, सोनं-चांदी, काजू हे महाग झाले आहेत. 


केंद्र सरकारने अर्थसंकल्पात श्रीमंतांवरचा कर दर वाढवाला आहे. २ ते ७ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्नांवर सरकारने क रदर वाढवला आहे. २ ते ७ कोटी वर्षांचे उत्पन्नावरचा कर वाढणार असून आता ३ टक्के सरचार्ज द्यावा लागणार आहे.