Union Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget) 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार असून त्यांनी मागील वर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत डिजीटलाइज केली. त्यांनी दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच ब्रीफकेसऐवजी पारंपारिक 'बही खाता' पद्धतीने बजेटची कागदपत्रं संसदेमध्ये आणली होती. तर मागील वर्षी त्यांनी 'मेड-इन-इंडिया' आयपॅडचा (Indian Budget Journey Bahi Khata to iPad) पर्याय निवडला होता.


आयपॅडवर बजेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-19 च्या नियमांचं पालन करताना आयपॅडवर बजेट सादर करण्यात आलं होतं. मागील वर्षी पहिल्यांदाच म्हणजेच 2022-23 चा अर्थसंकल्प डिजीटली सादर करण्यात आला होता. भारत सरकारचं प्रती चिन्ह असलेल्या लाल रंगाच्या कापडाच्या कव्हरमधील आयपॅडने मागील वर्षी अनेकाचं लक्ष वेधलं होतं. अर्थमंत्र्यांनी 'बही खाता' किंवा ब्रीफकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रं संसदेत आणणं ही एक परंपरा आहे. अर्थसंकल्पीय भाषण आणि त्यासंदर्भातील कागदपत्रं या ब्रिफकेसमध्ये किंवा बही खात्यामध्ये असतात. मागील वर्षी हीच सारी माहिती निर्मला सितारमण आयपॅडमध्ये घेऊन आल्या होत्या. बजेटच्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री जेव्हा संसदेमध्ये येतात तेव्हा संसदेच्या प्रवेशद्रावारजळ फोटोग्राफर्स या ब्रिफकेसबरोबर अर्थमंत्र्यांचे फोटो काढतात. 


पहिला अर्थसंकल्प अन् बजेटचा अर्थ काय?


स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आर. के. शनमुखम चेट्टी यांनी 1947 साली पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी चेट्टी यांनी चामड्याच्या फोल्डरमध्ये कागदपत्रं आणली होती. 'बजेट' हा शब्द मूळच्या Bougette (बुजेत) या शब्दावरुन निर्माण झाला आहे. या शब्दाचा अर्थ होतो चामड्याची पिशवी. फ्रेंचमधील लोक पूर्वीच्या काळी आपल्याकडील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा वापर करत. या पिशवीला ते ‘बुजेत’ असे म्हणत. 


'बुजेत'चा बजेट कसा झाला?


आता या 'बुजेत'चा बजेट कसा झाला यामागे एक मजेदार किस्सा आहे. झालं असं की सन 1733 मध्ये इंग्लंडचे तत्कालीन अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल सन 1733-34 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत गेले. संसदेमध्ये येताना वॉलपोल यांच्या हातात एक चामड्याची पिशवी होती. या पिशवीत वॉलपोल यांनी अर्थसंकल्पीय भाषणाची कागपत्रं ठेवली होते. वॉलपोल हे संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी जागेवर उभे राहिले आणि त्यांनी ती पिशवी उघडली. मात्र त्यांनी पिशवी उघडताना ‘बुजेत इज ओपन’ असं म्हटलं. पण त्यांनी ‘बुजेत’ हा शब्द ज्या पद्धतीने अगदी हेलकावे खात उच्चारला तो अनेकांना ‘बजेट’ असा ऐकू गेला. 


त्यानंतर अनेकजण हसू लागले आणि विरोधकांनी तर वॉलपोल यांची खिल्ली उडवण्यासाठी चक्क एक पुस्तिका छापली. वॉलपोल यांच्या अर्थसंकल्पामधील आर्थिक नियोजनातील चुका दाखवण्याच्या उद्देशाने विरोधकांनी वॉलपोल यांनी उच्चर करताना ऐकून आलेल्या 'बजेट'चा धागा पकडत ‘बजेट इज ओपन’ या नावाने एक पुस्तिकाच प्रकाशित केली. मात्र वॉलपोल यांना खोचपणे दाखवलेली ही चूक त्यांनी फारस स्पोर्टींगली घेत 'बुजेत'ला ‘बजेट’ असं म्हणायला सुरुवात केली. तेव्हापासून 'बुजेत'ला ‘बजेट’ असेच म्हटलं जाऊ लागलं.