Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार, 3 मुख्य रेल्वे कॉरिडोअर प्रोग्रामची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. तसंच गेल्या 10 वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या 1000 विमानांसाठी ऑर्डर देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"रेल्वेसाठी तीन नवे कॉरिडोअर सुरु कऱण्यात येणार आहेत. पहिला कॉरिडोअर ऊर्जा, मिनरल आणि सिमेंट कोरिडोअर असेल. दुसरा बंदरांना जोडणारं, आणि तिसरं सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या ठिकाणी असेल. पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत हे कॉरिडोअर उभारले जातील. लॉजिस्टिक सुविधा वाढवण्यावर आणि किंमत कमी करण्यावर भर असेल. तसंच प्रवासी ट्रेन, सुरक्षा आणि अतीवेग याकडे लक्ष असेल. हे तिन्ही आर्थिक कॉरिडोअर जीडीपी वाढवतील आणि लॉजिस्टिक खर्च कमी करतील," अशी आशा निर्मला सीतरमण यांनी व्यक्त केली आहे. 


40 हजार नियमित रेल्वे डबे वंदे भारतच्या दर्जात रुपांतरित केले जातील अशी घोषणाही निर्मला सीतारमण यांनी केली आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि उत्तम सुविधेच्या हेतूने बे बदल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  


पुढे त्या म्हणाल्या की, "गेल्या 10 वर्षात विमातळांची संख्या दुप्पट झाली आहे. उडान योजनेंतर्गत विमानतळांच्या विकासाचा विस्तार करण्यात आला आहे. 570 नव्या मार्गांवर 1.30 कोटी प्रवासी प्रवास करत आहेत. भारतीय कंपन्यांनी 1000 नव्या विमानांसाठी ऑर्डर देण्यात आली आहे". मेट्रो, नमो भारतचा विस्तार करण्याकडेही आमचं लक्ष आहे.