गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती स्थिर, १२ दिवसांनी एम्समधून डिस्चार्ज
१८ ऑगस्ट रोजी रुग्णालयात केलं होतं दाखल
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एम्सने दिलेल्या माहितीनुसार अमित शाह यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. अमित शाह यांना १८ ऑगस्ट रोजी हल्का ताप आला होता. त्यावेळी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केलं होतं. जवळपास १२ दिवसांनी घरी पाठवण्यात आलं आहे.
२ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल केलं होतं. १२ ऑगस्ट रोजी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं. त्यानंतर ते होम आयसोलेनमध्ये होते.
कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती. ईश्वराचे आणि सर्वांचे आभार मानले होते. मात्र त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा ताप आला होता. १८ ऑगस्ट रोजी त्यांना रात्री उशिरा रुग्णालयात दाखल केलं.
रुग्णालयातून त्यांनी काही प्रमाणात काम देखील केलं. तब्बल १२ दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आलं.