मुंबई : Coronavirus: देशात अनेक राज्यांत कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. देशात कोरोनाचा ( Coronavirus) प्रकोप वाढत आहे. त्यामुळे होळी (Holi 2021) सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत. कोविड-19 च्या निर्देशांचे आणि नियमांचे कठोर पालन करण्याचे बजावले आहे. मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन पाळणे, साबणाने सातत्याने हात धुणे आणि स्वच्छता राखा असे आपल्या निर्देशात केंद्राने म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे राज्यांना कोरोना नियमांबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी हे निर्देश दिले आहेत. राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कोरोनव्हायरस टाळण्यासाठी खबरदारीच्या पावले उचलण्याची सूचना देण्यात आली आहे. (Union Home Secretary Ajay Bhalla writes to all states & UTs amid surge in COVID19 cases )



देशात शुक्रवारी 39 हजार 726 नवे रुग्ण आढळून आले. हा यंदाच्या वर्षीचा, तसेच गेल्या 110 दिवसांतील सर्वांत मोठा आकडा आहे. शुक्रवारी 154 जणांचा मृत्यू झाला असून, ही संख्या आदल्या दिवशीपेक्षा कमी आहे. कोरोना बळींची संख्या 1 लाख 60 हजारांच्या घरात पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण 96.26 टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. 


दरम्यान, मध्य प्रदेशात महाराष्ट्रातून जाणाऱ्या बस कोरोनाच्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातही पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) कहर पहायाला मिळत आहे. कोरोनाचा धोका जरी वाढत चालला असला, तरी लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रूग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ झाली आहे. तर 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे 25 हजारांहून अधिक रूग्ण वाढले आहे. तर, सध्या राज्यात 1 कोटी 77 हजार 560 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुंबईत गेल्या 24 तासांत आजपर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. राज्यातल्या सर्व खासगी ऑफिसेसमध्ये 50 टक्केच उपस्थिती ठेवावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.