गेल्या काही दिवसांपासून मर्सिडीज (Mercedes Benz) या गाडीच्या कंपनीची जोरदार चर्चा सुरुय. टाटा सन्सचे (Tata Sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर मर्सिडीज कंपनीच्या (Mercedes Benz) अधिकाऱ्यांनी येऊन त्यांच्या गाडीची पाहणी केली होती. यानंतर मर्सिडीजची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलेल्या एका विधानाने पुन्हा मर्सिडीजच्या (Mercedes Benz) गाडांच्या चर्चा रंगू लागलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या बेधड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सध्या अशाच त्यांच्या एका विधानाची खूप चर्चा होत आहे. जर्मनीतील (germany) आघाडीची कार उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंझच्या (Mercedes Benz) एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे. मी तुमची गाडी घेऊ शकत नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.


मर्सिडीज बेंझच्या नवीन कारच्या लाँचिंगला केंद्रीय मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी मर्सिडीज बेंझ गाड्या स्थानिक पातळीवर तयार करण्यास सांगत होते. जेणेकरून त्याची किंमत कमी होईल आणि जास्तीत जास्त लोक ते विकत घेऊ शकतील. याबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, "भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मोठी बाजारपेठ आहे. उत्पादन वाढवले ​​तरच खर्च कमी होऊ शकतो. आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत, मीही तुमची कार खरेदी करू शकत नाही."


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत र्सिडीज-बेंझने पुण्यात भारतीय बाजारपेठेत पहिली मेक-इन-इंडिया (Make in India) Mercedes-Benz EQS 580 इलेक्ट्रिक सलून कार लॉन्च केली. यावेळी नितीन गडकरी यांनी  मर्सिडीज-बेंझला स्थानिक पातळीवर अधिक गाड्यांचे उत्पादन करण्यास सांगितले.


इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 335 टक्क्यांनी वाढली


नितीन गडकरी म्हणाले की, "भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत ३३५ टक्के वाढ झाली आहे. देशात एक्सप्रेस हायवे आल्याने मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या वाहनांना चांगली बाजारपेठ मिळेल. सध्या देशातील ऑटोमोबाईल मार्केट 7.8 लाख कोटी रुपयांचे आहे. यामध्ये 3.5 लाख कोटी रुपयांची निर्यात आहे. ही बाजारपेठ १५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे स्वप्न आहे."


दरम्यान, पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका चक्क मर्सिडिज बेंझचे भारतातले सीईओंना (Mercedes-Benz India CEO) बसला होता. मर्सिडिज बेंझचे सीईओ मार्टिंग श्वेंक (Martin Schwenk) हे त्यांच्या मर्सिडीज एस क्लास (Mercedes-Benz S class) ने पुण्यातील रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहतूक कोंडीत अडकले होते. काही केल्या वाहतूक पुढे सरकत नसल्यान अखेर श्वेंक यांनी आपली गाडी तिथेच सोडली. त्यानंतर काही प्रवास त्यांनी पायीच केला आणि त्यानंतर त्यांनी थेट रिक्षाने पुढचा प्रवास केला.