नवी दिल्ली : कोरोना काळात सर्वकाही ठप्प असताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मात्र युद्धपातळीवर रस्ते तयार करण्यात व्यस्त होता. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान मंत्रालयाने रस्ते बांधण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने कोरोना काळात अपेक्षेपेक्षा दुप्पट रस्ते तयार केले आहेत, तर मंत्रालयाने महामार्ग बांधकाम पूर्ण करण्याचा तीन वर्षांचा विक्रम मोडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान एकूण 2771 किमीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले होते. कोरोना काळातील प्रतिकूल परिस्थिती असूनही, लक्ष्यापेक्षा चारशे किलोमीटरपेक्षा जास्त म्हणजेच 3181 किमी महामार्गाचं काम पूर्ण झालं.



यामध्ये राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) 2104 किमी, एनएचएआय 879 किमी आणि एनएचआयडीसीएलने 198 किलोमीटरचा महामार्ग बांधला.


ऑगस्ट 2019 पर्यंत 1367 किमी राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा विक्रम नोंदवला गेला होता. तर ऑगस्ट 2020 पर्यंत दुप्पट 3300 किमी राष्ट्रीय महामार्ग बनवण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.


मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, कोरोनाची साथ असताना एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 744 किलोमीटरचा महामार्ग बनवण्यात आला. ज्याला 31 हजार कोटींचा खर्च आला. हे गेल्या तीन वर्षातील हा विक्रम आहे.