नवी दिल्ली : मोदी मंत्रीमंडळ विस्ताराची आणि फेरबलाची वेगाने सुरूवात झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मोदी मंत्रीमंडळातील पहिल्या फळीतील नेते अशी ओळख असलेल्या रूडी यांच्यावर पक्षकार्य आणि संघटनेची सूत्रे सोपवली जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर रूडी यांनी राजीनामा दिल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पक्ष रूडी यांच्या मत्री म्हणून कामगिरीवर खूश नव्हता. त्यामुळे  मंत्रीपदाला डच्चू देऊन त्यांच्यावर पक्षकार्याची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रूडी यांनी आपला राजीनामा सोपवला. रूडी बिहारमधील सारण मतदारसंघातून रूडी प्रतिनिधीत्व करतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रूडी यांना गुरूवारी बैठकीसाठी बोलवले होते. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे समजते. दरम्यान, मोदी मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ घातला आहे. त्यादृष्टीने जुन्या मंत्र्यांना नारळ देण्याचे काम सुरू आहे.