हैदराबाद : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी त्यांना खडे बोल सुनावल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधी आणि काँग्रेस सरकारवर टीका करत ज्यांनी गरिबांची आणि देशाची लूट केली तेच आता पंतप्रधानातंर टीका करतात तरी कसे? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या थेट आणि आक्रमत शैलीत त्यांनी राहुल गांधी यांना निशाण्यावर घेत त्यांना खडे बोल सुनावले. जे स्वत:च  भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहेत, ते प्रधान सेवकांच्या भूमिकेवर प्रश्न कसा उपस्थित करु शकतात, असाच प्रश्न त्यांनी प्रकर्षाने पुढे केला. राहुल गांधी यांनी राफेल कराराप्रकरणी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेनंतर त्यांचा इराणींनी समाचार घेतला. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महबूबनगर येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत त्या बोलत होत्या. 


राहुल यांच्या बहिणीच्या म्हणजेच काँग्रेसच्या महासचिवपदी असणाऱ्या प्रियांकाच गांधी यांच्या पतीचं नाव पुढे करत त्यांनी यावेळी रॉबर्ट वाड्रा यांच्या लंडनमधील बेहिशोबी मालमत्ताप्रकरणावरही बोचऱ्या शब्दांत टीका केली. गेली कित्येक वर्षे जे श्रीमंतीचा सुखोपभोग घेत आहेत, वर्षानुवर्षे गरिबांची लूट करत आहेत, ज्यांच्या बहिणीचा पती लंडनमध्ये मालमत्ता खरेदी करत आहेत तेच पंतप्रधानांवर टीकाकरण्याचं साहस करतात...' असं प्रश्नार्थक विधान त्यांनी केलं. त्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर आता राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठींपैकी नेमकं कोण आणि काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.