नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात १२८ रुग्ण समोर आले आहेत. यातच केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे कोरोनाग्रस्त डॉक्टरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी घरातच स्वतःला वेगळं करुन घेतलं होतं. केरळमध्ये एका कॉन्फ्रेन्स दरम्यान ते एका कोरोना झालेल्या डॉक्टरांच्या संपर्कात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी खबरदारी म्हणून घरातच स्वतःला वेगळं करुन घेतलं होतं. यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट केली. एएनआयच्या माहितीनुसार त्यांचं रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



कोरोनामुळे भारतात ३ जणांचा मृत्यू 


देशात कोरोनामुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक, दिल्ली आणि मुंबईत एकाचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत एका ६३ वर्षाच्या रुग्णाचा कस्तुरबा रुग्णालायता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशात १५ राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण ३९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालय, हॉस्टेल सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. तसेच राज्यातील अनेक मोठे देवस्थान देखील काही दिवसांसाठी दर्शनसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.