मुंबई : मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. मुलीचं शालेय जीवन हे अतिशय सुरक्षित आणि चांगल्या विचारांमध्ये व्हावं याकरता प्रत्येक पालक आणि शिक्षक झटत असतो. अशाच एका शिक्षकाचं भरपूर कौतुक होत आहे. ते शिक्षक आहेत संदीप जोशी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी शाळेत शिकवत असलेल्या संदीप जोशी यांच्या उपक्रमाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. संदीप जोशी यांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांवरील दप्तराचे ओझे कमी करणे, कन्यापूजन मानसिक शिक्षा पद्धतीचा फॉर्मूला अनेक शाळांमध्ये लागू करणं. तसेच शैक्षणिक स्तरावर बदल करून केंद्र आणि राज्य सरकारला सुचवले आहेत.


दिवसेंदिवस लहान मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी एक अभिनव पाऊल उचलले आहे. जालोर जिल्ह्यात संदीप जोशी यांनी कन्या पूजनाचा कार्यक्रम सुरू केला. हे अभियान गेले 4 वर्षे सुरू आहे. यंदाचं त्यांच पाचवे वर्ष आहे. गेल्यावर्षी राजस्थानच्या 29 जिल्ह्यात 1000 हून अधिक शाळांमध्ये कन्या पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक विद्यार्थी आणि 15 हजाराहून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला.  


हे अभियान शिक्षकांकडून स्वतः चालवले जाते. याकरतो कोणतीही समिती किंवा सरकारकडून काहीही मदत मिळत नाही. शिक्षक हे एक कुटुंब कर्तव्याने करताना दिसतात. देशभरात मुलींवर खूप अत्याचार होतात. हे अत्याचार रोखण्यासाठी जोशी यांच हे अनोखं पाऊल आहे. शाळेतच मुलांवर नारी सन्मान हा संस्कार रुजवला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना महिलांप्रती चांगला विचार करण्याचा संस्कार केला जातो. यामुळे या शाळेतील विद्यार्थी तरी असं दुष्कर्म करणार नाही हा विचार करून हे अभियान सुरू केले आहे.