अॅक्सीडेंटने बना दी जोडी! तरूण-तरूणी रूग्णालयात अडकले लग्नबंधनात
Shocking love story : बिघा गावात राहणाऱ्या नीरज कुमार या तरूणाचे मैत्रीण कौशल्या कुमारी सोबत प्रेमसंबंध (Love story) होते. दोघेही आपआपल्या कुटूंबियांना पासून लपून भेटायचे. अनेकदा दोघेही प्रेमीयुगल कुटूंबियांच्या नकळत एकत्र फिरायलाही जायचे. असेच एक दिवशी नीरज कुमार कौशल्याला घेऊन बाजारपेठेत फिरायला गेला होता.
Shocking love story : देशात लग्नाचा माहोल सुरू आहे. अनेक ठिकाणी लग्नाचे ढोल-नगाडे वाजतायत, वराती निघतायत. तसेच सोशल मीडियावर (Social media) देखील लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. अशात आता एका लग्नाची गोष्ट समोर आली आहे. या घटनेत प्रेमी युगलाचा अपघात झाला आणि या अपघातानंतर त्यांचे लग्न जुळल्याची घटना घडली आहे. या लग्नाची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. (unique marriage story arwal girlfriend boyfriend married on hospital bed bihar story)
अशी कळाली लव्ह स्टोरी
बिघा गावात राहणाऱ्या नीरज कुमार या तरूणाचे मैत्रीण कौशल्या कुमारी सोबत प्रेमसंबंध (Love story) होते. दोघेही आपआपल्या कुटूंबियांना पासून लपून भेटायचे. अनेकदा दोघेही प्रेमीयुगल कुटूंबियांच्या नकळत एकत्र फिरायलाही जायचे. असेच एक दिवशी नीरज कुमार कौशल्याला घेऊन बाजारपेठेत फिरायला गेला होता. यावेळी फिरून झाल्यानंतर घरी परतत असताना त्यांची दुचाकी कारला धडकली होती. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. यावेळी स्थानिकांनी त्यांना नजीकच्या रूग्णालयात (Hospital)दाखल केले होते. यावेळी दोघांच्या कुटूंबियांना प्रेमप्रकरणाचा उलगडा झाला होता.
रूग्णालयातचं लावलं लग्न
अपघाताची माहिती मिळताच दोघांचे कुटूंब रूग्णालयात (Hospital) दाखल झाले होते. तसेच दोघांना एकाच रूग्णालयात एकाच वॉर्डमध्ये बाजू बाजूला ठेवले होते. तसेच दोघांच्या अपघाताची घटना देखील सारखीच होती. त्यामुळे कुटूंबियांना दोघांवर संशय आला होता आणि त्यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरु असल्याची कुणकुण लागली होती.
कुटूंबियांच्या निर्णयाने प्रेमीयुगलाला बसला धक्का
अपघाताच्या या घटनेनंतर दोघांवर यशस्वी उपचार करण्यात आले. यानंतर दोघांची प्रकृती ठिक झाल्यानंतर दोघांच्या कुटूंबियांनी त्याचे लग्न लावून देण्याचा निर्णय़ घेतला. त्यानुसार रूग्णालयात (Hospital)दोघांनी एकमेकांना हार घातले. तसेच इतर रिवाजही पुर्ण करण्यात आले. या लग्नात रूग्णालयाचे कर्मचारी आणि रूग्ण देखील सामील झाले होते. अशाप्रकारे दोघांचे लग्न रूग्णालयात पार पडले. कुटूंबियांच्या या निर्णयाने प्रेमीयुगलाला देखील धक्का बसला होता.
दरम्यान ही घटना बिहारच्या (Bihar) अरवालमध्ये घडली आहे. या अनोख्या लग्नाची संपूर्ण जिल्ह्यासह सोशल मीडियावर (Social media) चर्चा आहे.