अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांची `तेजस` सफर
अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांनी स्वदेशी बनावटीच्या `तेजस` या लढाऊ विमानातून उड्डाणाचा अनुभव घेतला.
मुंबई : अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांनी स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' या लढाऊ विमानातून उड्डाणाचा अनुभव घेतला.
एअर फोर्सच्या जोधपूर तळावरुन त्यांनी तेजसमधून उड्डाण केलं. यावेळी एअर व्हाईस मार्शल एपी सिंह सहवैमानिक म्हणून त्यांच्यासोबत होते. भारत-अमेरिकासंबंध अधिक दृढ व्हावेत या हेतुन डेव्हीड गोल्डफीन गुरुवारपासून भारत दौ-यावर आलेत. त्यांची ही तेजस सफर म्हणजे भारत-अमेरिका दृढ संबंधांचे संकेत असल्याचे बोललं जातंय.
याआधी यापूर्वी सिंगापूरचे संरक्षण मंत्री इंग हेन यांनी सुद्धा तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेतलाय.