मुंबई : चीनशी झालेल्या युद्धात पराभवानंतर भारतीय जवान सावरत असतानाच सप्टेंबर 1965 मध्ये पाकिस्तानशी भारताचं युद्ध झालं. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याला धुळ चारली आणि काश्मीरसह पाकिस्तानच्या 720 वर्ग मील क्षेत्रावर देखील ताबा मिळवला. पण तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 22 दिवस सुरु असलेल्या या युद्धाची संपूर्ण माहिती आपल्या डायरीमध्ये लिहिली होती. त्यांच्या याच दैनंदिन डायरीवर आधारीत एक पुस्तक आलं. '1965 भारत-पाक युद्धाची न ऐकलेली कहानी।'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशवंतराव चव्हाण यांनी जेव्हा संसक्षणमंत्री म्हणून पद स्वीकारलं. तेव्हा त्यांच्या समोर मनोबल खचलेल्या सैन्याला पुन्हा उभारी देण्याचं मोठं आव्हान होतं. त्यांनी मात्र हे आव्हान यशस्वीपणे पार पाडलं. या सोबतच त्यांनी राजकीय आणि सैन्य नेतृत्वाच्या मध्ये देखील विश्वास कायम केला. कारण त्यांच्या याआधी कृष्ण मेनन यांच्या कामाच्या पद्धतीमुळेदोघांमध्ये एक दरी निर्माण झाली होती. असं बोललं जातं. या पुस्तकात भारतीय सैन्याच्या शौर्याचा उल्लेख आहे. सोबतच युद्धादरम्यान काही सैन्य कमांडर यांनी केलेल्या चुकांचा देखील उल्लेख आहे.


हे युद्ध अनेक गोष्टींमुळे वेगळं युद्ध होतं. या युद्धाच भारतीय वायुदलाची महत्त्वाची भूमिका होती.


पाकिस्ताचं वायुदल एफ-104 स्टार फायटर, एफ-86 सॅबर जेट आणि बी-57 असं लढाऊ विमानं होती. पण एअर मार्शल अर्जुन सिंह यांच्या नेतृत्वात भारतीय वायुदलाच्या वैमानिकांनी पाकिस्तानचे अनेक एफ-86 लढावू विमानं पाडली. त्यांनी आपल्या हल्लातून जमिनीवरील सैन्याला देखील अनेक झटके दिले. अनेक सैन्य अधिकाऱ्यांच्या आत्मकथांमध्ये य युद्धाचा उल्लेख आहे. पण हे पुस्तक एक राजकीय नेत्याच्या दृष्टीकोनातून या युद्धावर नजर टाकते. जे दर्शवते की हे युद्ध का महत्त्वाचं होतं आणि भारताला यातून काय मिळालं.


पुस्तक : 1965 भारत-पाक युद्ध की अनकही कहानी
लेखक : आरडी प्रधान