मुंबई : अनलॉक-3 साठी एसओपी बनविण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. अर्थात, अनलॉक -2 31 जुलै रोजी समाप्त होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सिनेमा हॉल अनलॉक -3 मध्ये सामाजिक अंतरासह उघडण्याची परवानगी मिळू शकते. माहिती प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. ज्यामध्ये १ ऑगस्टपासून सिनेमा हॉल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी माहिती प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी 50 टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. मंत्रालयाला सुरुवातीला 25 टक्के उपस्थितीसहच नियमांचे काटेकोरपणे पालन करत सिनेमा हॉल सुरू करायचे आहेत.


इतकेच नाही तर अनलॉक -3 मधील सिनेमा हॉल सोबत जिम देखील उघडण्याची परवानगी मिळू शकते. पण शाळा आणि मेट्रो सेवा मात्र सुरु होणार नाही. राज्यांना अनलॉक 3 मध्ये आणखी काही दिलासा दिला जावू शकतो.


कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. जो जूनपर्यंत चालला. 30 जूनला अनलॉक 1 अंतर्गत कोरोना संकटामुळे लागू केलेला लॉकडाऊन शिथिल झाला. ज्यामध्ये आर्थिक निर्बंध उघडले गेले. त्यानंतर, अनलॉक-2 हा 1 जुलैपासून सुरू झाला. जो 31 जुलै रोजी संपणार आहे.


अनलॉक-3 मध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा विचार होता. परंतु गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सरकारही चिंतेत आहे. म्हणूनच, शाळा-महाविद्यालयावरील बंदी सध्या कायम राहू शकते.


देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत


गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाली आहे. दररोज सुमारे 50 हजार प्रकरणे समोर येत आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार कोरोनाची एकूण प्रकरणे वाढून 13 लाख 85 हजार 522 झाली आहेत. देशात आतापर्यंत 8,85,577 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4,67,882 लोकांवर उपचार सुरू आहेत.


आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 48,661 नवे रुग्ण वाढले असून 705 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांचा आकडा 32,063 वर पोहोचला आहे.