Delhi CM Arvind Kejriwal :  कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात EDने अटक केली आहे.  ED मार्फत केजरीवाल यांची कसून चौकशी सुरु आहे. केजरीवाल यांच्याकडे ED ला चार फोन सापडले आहे. केजरीवाल यांचा आयफोन  लॉक आहे.  केजरीवालांचा iPhone अनलॉक करून द्या अशी विनंती  ED Apple कंपनीला केली आहे.  Apple कंपनीने यावर धक्कादायक उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना ईडीनं चौकशीसाठी अनेकदा समन्स पाठवलं होतं. मात्र त्यांनी चौकशीला जाण्याचं टाळलं होतं. त्यामुळे अखेर ईडीचं पथक त्यांच्या घरी दाखल झालं. त्यांनी दोन तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना अखेर अटक करण्यात आली.  21 मार्चच्या रात्री ED ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. तेव्हापासून केजरीवाल हे ईडीच्या ताब्यात आहेत. केजरीवाल  यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आज त्यांची ईडी कोठडी संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर केलं असता 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


केजरीवाल यांच्या  iPhone मध्ये नेमकं आहे तरी काय?


केजरीवाल यांच्याकडे चार फोन सापडले आहेत. चौकशी दरम्यान केजरीवाल यांचा  iPhone अनलॉक करणं हे ED समोरचे मोठे आव्हान आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपले iPhone Switch Off केले आहेत. पासवर्ड टाकल्याशिवाय आयफोन अनलॉक होऊ शकत नाही. केजरीवाल हे  ED च्या चौकशी अधिकाऱ्यांना पासवर्ड सांगण्यास नकार देत आहेत. घोटाळ्यासंबधीत पुरावे गोळा करण्यासाठी या फोनमधील डेटा ED अधिकाऱ्यांना तपासायचा आहे. यासाठी केजरीवाल यांचा आयफोन अनलॉक होणे अत्यंत गरेजेचे आहे. 


केजरीवालांचा iPhone अनलॉक करुन देण्याची ED ची Apple कंपनीला विनंती


सर्वात बेस्ट सेफ्टी फिचर्स हेच आयफोनचे वैशिष्ट्य आहे. युजरच्या पासवर्डशिवाय दुसरं कुणीही आयफोन अनलॉक करु शकत नाही. यामुळेच केजरीवालांचा iPhone अनलॉक करून द्या अशी विनंती ED ने Apple ने कडे केली आहे.  केजरीवाल यांच्या आयफोनमधील डेटा आम्हाला मिळवून द्या अशी मागणी ED ने Apple कंपनीकडे केली आहे. मात्र, केजरीवाल यांनी पासवर्ड दिल्याशिवाय आयफोन अनलॉक होऊ शकत नाही. यामुळे फोनचे लॉक उघडल्याशिवाय डेटा मिळवता येवू शकत नाही असे उत्तर Apple कंपनीने दिले आहे.