वर्षभरापूर्वी बलात्कार आणि त्यानंतर तरूणीला जिवंत जाळलं
उन्नावमध्ये वर्षभरापूर्वी बलात्कार करण्यात आलेल्या तरुणीला रॉकेल टाकून जाळलंय.
उन्नाव : उन्नावमध्ये वर्षभरापूर्वी बलात्कार करण्यात आलेल्या तरुणीला रॉकेल टाकून जाळलंय. गावाबाहेर शेतामध्ये तिला जाळलंय. पाचपैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या बातमीनं खळबळ माजलीय. गंभीर भाजलेल्या युवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. त्यानंतर लखनऊच्या ट्रॉमा सेंटरला तिला नेलं. तरुणीला जाळल्यानंतर आरोपींनी पळ काढला होता.
वर्षभरापूर्वी या तरुणीवर बलात्कार करण्यात आलेला. ज्यांनी तिला जाळलं त्यांनीच बलात्कार केला असण्याची शक्यता वर्तवलीय. उन्नावच्या हिंदुनगरमधली ही संतापजनक घटना आहे. फरार दोघांना पकडण्यासाठी पोलिसांची ४ पथकं तयार केली आहेत.
बलात्कार केलेल्या एका आरोपीलाही अटक केली आहे. युवतीची प्रकृती गंभीर आहे. हैद्राबादमधलं डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून जाळल्याच्या प्रकरण ताजं असतानाच उन्नावमध्ये पुन्हा एक तरुणीबाबत असाच प्रकार घडला आहे.