Unnatural Sex Demand by Husband: उत्तर प्रदेशमधील हमिरपूर जिल्ह्यामध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. येथील एका विवाहित महिलेने आपल्याच पतीवर हल्ला केला आहे. मात्र या महिलेने आपल्या पतीवर हल्ला करताना चक्क त्याच्या गुप्तांगाचा चावा घेत त्याला जबर जखमी केलं आहे. पती सातत्याने पत्नीकडे एक विचित्र मागणी करत होता. याच मागणीला वैतागून तिने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. सध्या हा गंभीर जखमी पती हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.


अनेक दिवसांपासून करत होता मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी महिलेचा पती तिला अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यासाठी हट्ट करत असल्याची माहिती समोर आली आहे. 28 जानेवारी रोजी घडलेल्या या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीची ओळख समोर आली आहे. जखमी झालेला पती 34 वर्षांचा असून त्याचं नाव रामू निषाध असं आहे. सध्या रामूला उपाचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, 28 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास या नवरा-बायकोमध्ये अनैसर्गिक शरीरसंबंधांच्या मुद्द्यावरुन वाद झाला.


प्रकृती चिंताजनक...


पती मागील अनेक दिवसांपासून पत्नीकडे अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करत होता. रविवारी याच मुद्द्यावरुन झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर या महिलेने आपल्या पतीच्या गुप्तांगाचा कडकडून चावा घेतला. हा हल्ला एवढ्या ताकदीने करण्यात आला की पुरुषाच्या गुप्तांगातून रक्ताची धार पडू लागली. तातडीने या पीडित पुरुषाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला इतका जबर होता की या पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे. अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून या व्यक्तीला दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


कोणते गुन्हे दाखल केले?


या प्रकरणामध्ये भारतीय दंडसंहितेमधील कलम 326 अंतर्गत पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणीवपूर्वकपणे एखाद्याला दुखावण्याच्या आरोपाखाली या कलमाअंतर्गत कारवाई होते. तसेच कलम 506 अंतर्गत गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणामध्ये पतीची अवस्था पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.


पोलिस काय म्हणाले?


या प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी अनुप सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी स्थापन करण्यात आली आहे. या तुकडीच्या माध्यमातून अनुप सिंह या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये पत्नीविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.