नवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तर उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्हा आता 'रेप कॅपिटल' म्हणून ओळखला जातो. वर्षभरात याठिकाणी तब्बल ८६ बालात्काराच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे परिसरात संतापाचे वातापरण आहे. गेल्या वर्षी बलात्कार झालेल्या पीडित महिलेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. पाच आरोपिंनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. 
 
त्यात ती ९० टक्के जळाली होती. जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०१९ याकाळात उन्नावमध्ये ८६ बलात्काराची प्रकरणे समोर आली आहेत. उन्नाव जिल्ह्याची लोकसंख्या ३१ लाख आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या सांगण्यानुसार, याच दरम्यान जिल्ह्यातील १८५ महिलांसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची प्रकरणे देखील समोर आली आहेत. 'कुलदीप सिंह सेंगर' आणि नुकताच झालेला बलात्कारपीडितेचा मृत्यूमुळे अन्य बलात्कार प्रकरणांनी डोकं वर काढलं आहे. 


ज्यामध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी १ नोव्हेंबर रोजी आरोप दाखल करण्यात आला होता. उन्नाव जिल्ह्यातील असोहा, अजगैन, माखी आणि बांगरमऊमधून  अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


यामधील बहुतांश आरोपी मोकाट फिरत आहेत. तर काहींना जामीन मिळाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांचे जगणे कठिण झाले आहे. या प्रकराणांमध्ये स्थानिक जनता पोलिसांना दोषी ठरवत असल्याचे दिसून येत आहे. 


'उन्नाव जिल्ह्यातील पोलीस नेत्यांच्या इशाऱ्यावर चालतात. जोपर्यंत नेत्यांकडून पोलिसांना आदेश मिळत नाही तोपर्यंत पोलीस कोणतीच करत नाही. त्यामुळे येथे आपराधी असे कृत्य करतात.' असे वक्तव्य स्थानिक रहिवासी राम शुक्लाने केले. 


तर दुसरीकडे तेथील स्थानिक वकिलाने राजनितीमुळे अपराधांना चालना मिळत असल्याचे सांगितले आहे. 'येथे राजनितीमळे अपराधांना चालना मिळते. नेते अपराधांचा उपयेग राजकिय हेतू साधण्यासाठी करतात आणि पोलीस फक्त नाममात्र आहेत.'


एकंदर जोपर्यंत अशा घटनांना योग्य न्याय मिळणार नाही, तोपर्यंत देशातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच राहणार असल्याचं चित्र याठिकाणी दिसून येत आहे.