मुंबई : सर्वसामान्य जनता आधीच महागाईने होरपळली आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder Price) दरात वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात एकूण 25 रुपयांनी वाढ केली गेली आहे. त्यामुळे आता सर्वसामांन्याना खिसा आणखी रिकामी करावा लागणार आहे. सातत्याने होत असलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामांन्यामध्ये नाराजीचं वातावरण आहे. (Unsubsidised LPG cylinder price increse by  25 Rupees know the price in your city) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील सिलेंडरचे नवे दर....
 
मायानगरी मुंबईत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरसाठी आता 859.5 रुपये मोजावे लागणार होते. ही दरवाढ होण्याआधी मुंबईतील सिलेंडरचे दर हे  834.50 रुपये इतके होते. 
कोलकातामध्ये सिलिंडरचा दर 861 रुपयांवरून 886 रुपये इतका झाला आहे. चेन्नईमध्ये सिलेंडरसाठी  875.50 रुपये मोजावे लागणार आहेत. लखनऊमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी 897.5 रुपये द्यावे लागतील.  अहमदाबाद, गुजरातमध्ये एलपीजीसाठी 866.50 द्यावे लागतील. एकाबाजूला खाद्य तेल महागलंय. त्यात आता पुन्हा सिलेंडरच्या दरात वाढ होत असल्याने जगायचं तरी कसं, हा प्रश्न सर्वसामांन्यासमोर आवासून उभा आहे. 


8 महिन्यात 165.50 रुपयांनी महाग


2021 च्या सुरुवातीपासून  ते आतापर्यंत सिलेंडरच्या दरात एकूण 165.50 दरवाढ झाली आहे.  दिल्लीत सिलेंडरची किंमत 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढवून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. 15 फेब्रुवारीला किंमत वाढवून 769 रुपये करण्यात आली. यानंतर, 25 फेब्रुवारीला  किंमत कमी होऊन 794 रुपये झाली. मार्चमध्ये पुन्हा 819 रुपये झाले. एप्रिलच्या सुरुवातीला 10 रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत 809 रुपयांवर गेली होती.तर डिसेंबर 2020 पासून आतापर्यंत सिलेंडरच्या दरात जवळपास 275 रुपयांनी वाढ झाली आहे. 


शहरनिहाय सिलेंडरचे नवे दर रुपयांमध्ये 


दिल्ली     859.50 रुपये


मुंबई    859.50


कोलकाता  886.00


चेन्नई   875.50


लखनऊ  897.50


अहमदाबाद 866.50


व्यावसायिक सिलेंडरचे नवे दर... 


व्यावसायिक सिलेंडर 68 रुपयांनी महागले आहेत. त्यामुळे आता 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी दिल्लीत 1हजार 618 रुपये मोजावे लागणार आहेत.