Sasur Bahu Wedding: प्रेम आंधळं असतं असं आपण आतापर्यंत केवळ ऐकलं असेल, पण प्रेमाला वय देखील नसतं हे एका प्रकरणावरुन सिद्ध झालं आहे. 70 वर्षांच्या सासऱ्याने आपल्या 28 वर्षांच्या सुनेवर प्रेम जडलं आणि दोघांनी लग्नही केलं. एकमेकांच्या संमतीने दोघांनी एका मंदिरात सात फेरे घेतले. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणाची सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. (father in law marry with daughter in law)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाच्या पत्नीवर जडलं प्रेम
उत्तरप्रदेशमधल्या (Uttar Pradesh) गोरखपूरमधील छपिया उमराव गावातील ही घटना आहे. या गावात राहणाऱ्या 70 वर्षांच्या कैलाश यादव यांनी आपली सून पूजा हिच्याबरोबर लग्न केलं. विशेष म्हणजे सूनेचीही या लग्नाला संमती होती. कैलाश यादव हे पेशाने पोलीस आहेत. त्यांच्या पत्नीचं 12 वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांना चार मुलं आहेत. यातल्या तीन नंबरच्या मुलाच्या पत्नीसह कैलाश यादव यांनी लग्नगाठ बांधली. कैलास यादव यांचा तीन नंबर मुलाग म्हणजे पूजाच्या पतीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला.


सुनेचं करुन दिलं दुसरं लग्न
मुलाचा मृत्यू झाल्यानतर कैलाश यादव यांनी सून पूजाचा दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून दिलं. पण या घरात पूजा फार दिवस राहिली नाही. ती पुन्हा कैलाश यादव यांच्या घरी परतली. त्यानंतर ती तिथेच राहू लागली. या दरम्यान पूजाचं सासरा कैलाश यादववर जीव जडला. पुढे त्यांचे प्रेमसंबंध वाढत गेले आणि त्यांनी कुटुंबाची समाजाची पर्वा न करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोघांनी एका मंदिरात लग्नही केलं. सासरा-सूनेच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानतंर हा चर्चा विषय ठरला आहे. 


या कारणामुळे लग्न मोडलं
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक विचित्र घटना समोर आली होती. होणाऱ्या पतीला पैशांच्या नोटा मोजता येत नसल्याने एका मुलीने लग्न मोडलं. फारुखाबादमधीलही घटना आहे. नवऱ्या मुलाला देण्यात आलेल्या 10 रुपयांच्या काही नोटा मोजता आल्या नाही त्यामुळे या मुलीने मंडपातच लग्न मोडलं. लग्न समारंभामध्ये भटजींनी मुलीच्या कुटुंबियांना मुलाला नोटा मोजता येत नसल्याचं सांगितलं.  मुलीच्या कुटुंबियांनी लगेच मुलाची परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला. नवरीकडच्या लोकांनी नवऱ्याच्या हातात 10 रुपयांच्या 30 नोटा दिल्या आणि या मोजून दाखव असं सांगितलं. मात्र नवरा मुलगा या चाचणीत नापास झाला. 


होणाऱ्या नवऱ्याला नोटा मोजता येत नसल्याचं पाहून नवरी मुलगी चांगलीच संतापली. तीने मंडपातच लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.