UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपची (BJP) सत्ता येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. 403 जागांपैकी भाजपने 250 जागांपेक्षा अधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) 'पुन्हा येणार' हे पक्कं झालं आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी आदित्यनाथ इतिहास रचणार असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यकाळ पूर्ण करून सत्तेवर येणारे पहिले मुख्यमंत्री
उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री बनतील, जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात आजवर असं घडलेलं नाही. उत्तर प्रदेशमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत, पण त्यापैकी एकानेही पहिल्या 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. यामध्ये संपूर्णानंद, चंद्र भानू गुप्ता आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्या नावांचा समावेश आहे.


5 वर्षे पूर्ण करून सत्तेत परत 
2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (Uttar Pradesh CM) झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाची सत्ता उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करणार आहेत. 


योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि गोरखपूरमधून निवडणूक रिंगणात आहेत. 2003 नंतर पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर एखादा नेता मुख्यमंत्री होणार आहे.  2003 मध्ये मुलायमसिंह यादव आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री बनले होते. यानंतर मायावती, अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ स्वत: विधान परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते.